भटक्या-विमुक्त जमातींतील स्त्रियांचे शोषण आणि जातपंचायत विमल मोरे ०१ मे २०२०

महाराष्ट्रासह देशभरात भटक्या-विमुक्त जमाती दोन वेळच्या पोटाची भूक भागवण्यासाठी भटकत आहेत. भाकरीच्या शोधात भटकताना, लाचार, आगतिक अवमानित जीवन जगत आहेत. भारतीय समाजव्यवस्थेतील वर्णव्यवस्थेच्या आणि जातीव्यवस्थेच्या उतरंडीमध्ये या जमातींचा समावेश केलेला नाही. त्यामुळे या जमाती अवर्ण राहिल्या आहेत. गावगाड्याच्या उत्पादनव्यवस्थेमध्ये या जमातींना सामावून घेतले गेले नसल्याने, या जमातींना उत्पादन प्रकियेती…